संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठार भागात कॉंग्रेसचे नेते जयराम ढेरंगे यांनी एका न्युज चॅनलला दिलेल्या मुलाखतीने एकच खळबळ उडालीय. विशेषतः या मुलाखतीत जयराम ढेरंगे यांच्याकडून बोलताना धनगर समाजाबद्दल अपवादात्मक शब्द गेले होते. त्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.
जयराम ढेरंगे यांनी धनगर समाजाबद्दल अपवादात्मक शब्द बोलल्याने धनगर समाज चांगलाच आक्रमक झाल्याच बघायला मिळाले. त्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत जयराम ढेरंगे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत धनगर समाजाची दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र धनगर समाजाबद्दल अपवादात्मक शब्द बोलल्याने भाजपचे नेते बुवाजी खेमनर यांनी देखील निषेध व्यक्त केला आहे.
जयराम ढेरंगे यांनी काय दिलगिरी व्यक्त केली…
दोन दिवसापूर्वी मी एका न्यूज चॅनलला मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये बोलण्याच्या ओघातून चुकून धनगर समाजाबाबत माझ्याकडून शब्द गेला . त्याबाबत धनगर समाजातील काही मित्रांचे फोन मला आले तेव्हा समाजातील कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.
दरम्यान सदर मुलाखतीत जयराम ढेरंगे यांनी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांचं नाव न घेता टिका केली होती. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच यासंदर्भात थेट धनगर समाज आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे साकूर पठार भागात जातीय राजकारण पेटल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे आता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यातून काय तोडगा काढणार याकडेच सर्वाचे लक्ष लागले आहे.
