पारनेर(DSNews24) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दि. २ ऑक्टोबरला दसरा मेळाव्याचे निमित्ताने पारनेर दौऱ्यावर येत असल्याचे समजताच त्यांच्या नियोजित दौर्याला “अजित पवार – गो – बॅक” आंदोलनाने विरोध करण्याचा इशारा पारनेर कारखाना बचाव समिती व भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने दिला आहे. भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर व लोक जागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांची व सामाजिक संघटनांची पारनेर येथे बैठक झाली.
यावेळी उपस्थित भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांच्यासह साहेबराव मोरे, मनोज तामखडे, संतोष वाबळे, रामदास सालके, प्रवीण खोडदे, वसंत साठे, सुभाष करंजुले, गोरक्ष पठारे, अन्सार पटेल, रघुनाथ मांडगे, राहुल गुंड, प्रशांत औटी, सोमनाथ गोपाळे, अनिल सोबले, संभाजी सालके, अंकुश कोल्हे, रामदास सालके, गोविंद बडवे, बाबाजी वाढवणे, ज्ञानेश्वर काळे, महेंद्र पांढरकर, अरुण बेलकर, जालिंदर लंके आदी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी पारनेर विश्रामगृहावर झालेल्या बैठकी प्रसंगी उपस्थित होते.
तसेच व सध्या तालुक्यात परतिचा सर्व दूर पाऊस होत आहे या पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे,जमिनी पूर्ण खरडून वाहून गेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी.तसेच निवडणुकापूर्वी कर्ज माफिचा दिलेला शब्द पाळून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. कांद्याच्या बाजारभाव वाढीसाठी कोणताही ठोस निर्णय नाही यासंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटना व पारनेर कारखाना बचाव समिती आक्रमक झाली आहे.
तसेच कारखाना बचाव समितीने शासनाला दिलेल्या कारखाना पुनर्जीवनाच्या प्रस्तावावर देखील कोणताही निर्णय घेतलेला नाही. अजित पवार यांच्या शब्दावर विश्वास ठेवून पारनेरकरांनी त्यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार यांना विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी केलेले होते. परंतु त्यानंतर आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे या प्रकरणी त्यांचे लक्ष वेधण्याकरिता पारनेर साखर कारखाना बचाव समितीने त्यांच्या नियोजित पारनेर दौऱ्यावेळी ” अजित पवार – गो बॅक “, “अजित पवार – परत जा” असे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे आंदोलन आमच्या मागण्यांचे बाबत लक्ष वेधण्या करता करण्यात येणार असल्याची माहिती संघटनांच्या वतीने देण्यात आली.
