संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील चंदनापुरी घाटात एसटी बसचा अपघात झाल्याची घटना गुरूवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडलीय. संगमनेरहून चंदनापुरी मार्गे साकूरकडे जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. चंदनापुरी घाटात ही बस आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या साईडगटाराचा अंदाज न आल्याने बसच्या डाव्या बाजुची चाके साईडगटारात गेल्याने बस डाव्या बाजुला पुर्णपणे कलली गेली.
अचानक झालेल्या या प्रकाराने बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या बसमध्ये चंदनापुरी येथुन काही शालेय विद्यार्थी देखील बसले होते. मात्र सुदैवाने बसमधील शालेय विद्यार्थ्यांसह सर्व प्रवासी सुखरुप आहे. तसेच साकूरफाटा येथे असणार्या डाॅ.गुंजाळ यांच्या वृंदावन हाॅस्पिटलमध्ये किरकोळ दुखापत असणार्या प्रवाशांवर प्राथमिक उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आले.
मागे काही महिन्यांपुर्वी अशीच एक बस साइडगटारात कलल्याने अपघात झाला होता. पुन्हा अशाच प्रकारे एसटी महामंडळाच्या संगमनेर आगाराच्या बसचा अपघात झाल्याने चंदनापुरी घाटातुन प्रवास करणार्या शालेय विद्यार्थी व प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
जखमी झालेल्या प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे
१) जिजाबाई बाळासाहेब ढेंबरे ( वय ५२) – बिरेवाडी
२) बाबाजी कारंडे ( वय ६० ) – दरेवाडी
३) अंजाबाई रामनाथ पथवे ( वय ७० ) – कळस
४) ओम दत्तात्रय उंडे ( वय २० ) पिंपळगाव देपा
५) सुखुबाई भिमाजी बोऱ्हाडे ( वय ७५ ) गुंजाळवाडी
६) कोंडाबाई किसन बिडगर ( वय ६० ) साकूर
७) भिमराव भालेराव ( वय ६०) संभाजीनगर
८) मकरंद संतोष गंभिरे ( वय ९) कोपरगाव
९) तनिष्का संतोष गंभीरे ( वय १३ ) कोपरगाव
१०) लताबाई गजानन वनवे ( वय ६५) हिवरगाव पठार
११) रोहिणी पांडुरंग मलगुंडे ( वय २० ) पिंपळगाव देपा
