सुजित पा.खेमनर यांना पारनेरच्या भूमिपुत्रांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील स्व. अशोकराव बाजीराव पा. खेमनर यांचे चिरंजीव युवा नेते सुजित अशोकराव पा. खेमनर यांचा आज वाढदिवस कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला. सुजितराव यांचा दांडगा संपर्क असल्याने सर्वत्र क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव पडत आहे. कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्राद्वारे देखील शुभेच्छांचा संदेश पाठविला आहे

तसेच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेने देखील सुजित पा. खेमनर यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भूमिपूत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, तालुका कार्याध्यक्ष संजय भोर, माजी चेअरमन संजय भोर, रावसाहेब फटांगरे, नंदन भोर, बबन भोर उपस्थित होते.

Leave a Comment