संगमनेर – खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण देण्याचा कार्यक्रम केला. यावर कोट्यवधीपेक्षा अधिक खर्च झाला. प्रचंड उन्हात हा कार्यक्रम घेण्यात आला. अनेकांना याचा त्रास झाला. मोठा खर्च करुन ही नागरीकांना उन्हात बसावे लागले. अनेकांच्या पोटात अन्नपाणी नसल्याचे उघड झाले. त्यातून सरकारची क्रुरता यातून दिसुन येते.
या घटनेला शिंदे – फडणवीस सरकार जबाबदार असून व्हिआयपींना सावली व्यवस्था. लाखो साधकांना उन्हात बसावे लागल्याने यात 13 पेक्षा अधिक साधकांचा मृत्यू झाला असून हा मोठा गुन्हा सरकारकडून घडला. त्यामुळे आता नैतिकेच्या आधारावर मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी केला.
संगमनेर येथे पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते, पुढे बोलताना ते म्हणाले, या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असतांनाही शासनाकडून कार्यक्रमस्थळी सावलीची मात्र व्यवस्था करण्यात आली नव्हती.
पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी खारघर घटनेबाबत महाराष्ट प्रदेश कॉंग्रेसची भूमिका मांडतांना या घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सरकारने तातडीने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली.
