मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
मिथुन : गुरूकृपा लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
तुळ : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
वृश्चिक : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
धनु : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. हितशत्रुंवर मात कराल.
मकर : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
कुंभ : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. इतरांवर प्रभाव राहील.
मीन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहने जपून चालवावीत.
