संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील कुस्ती व कृषी पंढरीचे वारकरी समजले जाणारे कै. लक्ष्मण ( नाना) धुळगंड यांच्या नवव्या पुण्यस्मरण निमित्ताने वार – शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन साई ॲग्रो मॉल शेजारी करण्यात आले आहे.
या भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे उद्घाटन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व दक्षिण नगरचे खासदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, जिल्हा बँकेचे संचालक गणपत सांगळे, सह्याद्री शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष लहानुभाऊ गुंजाळ, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, अहिल्यानगर मनपाचे नगरसेवक नितीन जगताप, संगमनेर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर हे मान्यवर असणार आहे.
तसेच या कार्यक्रमावेळी राष्ट्रीय व महाराष्ट्र चॅम्पियन पै. संदिप चंद्रकांत कावरे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक रामदास धुळगंड सर यांनी दिली आहे.
कै. लक्ष्मण ( नाना) धुळगंड यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते. या आखाड्यात महाराष्ट्रातील नामांकित पैलवान उतरत असतात. तसेच महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन अशा विविध मल्लांना या जंगी आखाड्यात उतरण्याचा मान मिळाला आहे. तसेच यंदाच्या वर्षी देखील नामांकित मल्ल या आखाड्यात दिसणार आहे.
