सर्वात मोठी बातमी! राज्यातील निवडणूकीबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश, मतमोजणी कधी?

दिल्ली : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करताना 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी जाहीर केली होती. मात्र राज्यातील 24 नगरपरिषद आणि नगरपंचायतींना निवडणुकांना आयोगाकडून न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगिती देण्यात आली होती.

त्यामुळे त्या निवडणुकांसाठी 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणीची तारीख राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. मात्र, याविरोधात नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेनंतर सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश देण्यात आले होते. या नागपूर खंडपीठाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. सर्व मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार, असे आजच्या (5 डिसेंबर) सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

नागपूर खंडपीठाने दोन दिवसांपूर्वीच सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला लावण्यासंदर्भात निकाल दिला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असून स्थानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्याचे महत्त्वाचे निर्देश दिले आहे.

Leave a Comment