साकूरचे दिनकरराव मैड ठरले उत्कृष्ट सोनार पुरस्काराचे मानकरी

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथे गेल्या ६० वर्षांपासून सोनार व्यावसायात अग्रेसर असलेले दिनकरराव रघुनाथ मैड यांना साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्थेच्या वतीने उत्कृष्ट सोनार पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. राहुरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात साई आदर्शचे संस्थापक शिवाजीराजे कपाळे यांच्या हस्ते दिनकरराव मैड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.‌

सन २०२४ – २०२५ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट सोने तारण सेवा दिल्याबद्दल दिनकरराव मैड यांची साई आदर्श पतसंस्थेच्या वतीने या विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये सुप्रसिद्ध सोनार म्हणून ओळखले जाणारे दिनकरराव मैड यांनी विश्वासार्हता टिकवून सन २०२४ – २०२५ या आर्थिक वर्षात सोने तारणच्या माध्यमातून १० कोटींपेक्षा अधिक टर्न ओव्हर साई आदर्श पतसंस्थेला करून दिला आहे. त्यामुळे संस्थेच्या वतीने त्यांची उत्कृष्ट सोनार पुरस्कारासाठी निवड केली होती.

दरम्यान साकूर बाजारपेठेत गेली ६० वर्षांपासून दिनकरराव मैड सोनार व्यावसाय करत आहे. बाजारपेठेत त्यांच्या दोन शाखा असून एका शाखेत चिरंजीव गौरव व दूसऱ्या शाखेत चेतन हे दोघं असतात. दोन्ही चिरंजीव अगदी पारदर्शकपणे व विश्वासार्हतेने सोनाराचा व्यावसाय करत आहे. त्यामुळे त्यांची एक मोठी ओळख निर्माण झाली आहे. हजारो ग्राहक विश्वासाने अंबिका ज्वेलर्समध्ये सोने, चांदी खरेदी करण्यासाठी येत असतात. तसेच काही बॅंकामध्ये सोने तारणच्या माध्यमातून दिनकर मैड काम करत आहे.

त्यातील साई आदर्श मल्टीस्टेट या पतसंस्थेत गेली अनेक वर्षांपासून ग्राहकांचे सोने तारण करत असतात. अगदी पारदर्शकपणे आजपर्यंत त्यांनी कारभार केला आहे. त्यातच सन २०२४ – २०२५ या आर्थिक वर्षात तर दिनकरराव मैड यांनी साई आदर्श मल्टीस्टेटमध्ये सोने तारणच्या माध्यमातून १० कोटींपेक्षा अधिक रेकॉर्ड ब्रेक आर्थिक उलाढाल केली. त्यामुळे साई आदर्श मल्टीस्टेटने त्यांची विशेष दखल घेत उत्कृष्ट सोनार म्हणून पुरस्कार देत गुणगौरव करण्यात आला.

दिनकरराव मैड यांना उत्कृष्ट सोनार पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचं साकूरसह संगमनेर तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Comment