विद्या प्रबोधिनीचे कु. अशोकराव खेमनर व अदिती पेंडभाजे यांचं राज्यपातळीवर घवघवीत यश 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील विद्या प्रबोधिनी प्रशालेतील दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत नावलौकिक मिळविला आहे. इयत्ता पहिली मध्ये शिकणाऱ्या कु. अशोकराव इंद्रजित खेमनर व इयत्ता आठवी मध्ये शिकणारी कु. अदिती अतुल पेंडभाजे या विद्यार्थ्यांनी अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत विद्या प्रबोधिनी प्रशालेचे नाव राज्यात गाजवले आहे.

कु.अशोकराव इंद्रजित खेमनर हा विद्यार्थी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांचा चिरंजीव आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी रजिस्टार हेमचंद्र होळकर होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भालेकर सर होते. तसेच व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, सामाजिक कार्यकर्त्या मंदाताई खेमनर, सोनाली खेमनर, प्राजक्ता पेंडभाजे, पूजा खेमनर, प्राचार्या गुलशन जमादार, मुख्याध्यापक सुभाष घुगरकर, इन्चार्ज कोळेकर सर उपस्थित होते.

यावेळी कु. अशोकराव खेमनर व अदिती पेंडभाजे या विद्यार्थ्यांनी अबॅकसमध्ये राज्यपातळीवर मोठं यश संपादन केल्याबद्दल त्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ, पालक, शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांच तोंडभरून कौतुक केले.

Leave a Comment