लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष ; काकणेवाडी गाव अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित

पारनेर (DSNews24/किरण पुरी) मे आणि जून 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व गारपीट झाल्याने हातातोंडाशी आलेले पिके अक्षरशः नष्ट झाले. तसेच काही ठिकाणी जमिनी खरडून वाहून गेल्या. त्यानंतर राज्य सरकारने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. तसेच बहुतांश ठिकाणी काही प्रमाणात शेतकऱ्यांना मदतही मिळाली, मात्र पारनेर तालुक्यातील काकणेवाडी गाव आणि परिसरातील एकाही शेतकऱ्याला अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही.

यासाठी बऱ्याचदा लोकप्रतिनिधी, तहसीलदार यांच्याकडे वारंवार मागणी करून सुद्धा अद्यापपर्यंत कुठल्याच प्रकारे कार्यवाही झालेली दिसून येत नाही. उलट उडवा उडवीचे उत्तरे दिली जात असल्याने भूमिपुत्र शेतकरी संघटना व काकनेवाडी ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार यांना लेखी स्वरुपात निवेदन देऊन तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आलीय. तसेच मदत न मिळाल्यास भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली कुठल्याही स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण बेलकर, तालुका अध्यक्ष मनोज तामखडे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब वाळुंज, पारनेर शहराध्यक्ष अनिल सबले, जयवंत वाळुंज, प्रदीप वाळुंज, मच्छिंद्र वाळुंज यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment