संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूरसह परिसरात आज सकाळी १०.३० वाजता अचानक वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने कहर केल्याने नागरिकांची व शेतकर्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
तसेच जोरदार पाऊस सुरू आहे. सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकर्यांची व मजुरांची काढलेला कांदा झाकण्यासाठी त्रेधातिरपीट उडाली.
वादळी वार्याचा जोर इतका होता की, सगळीकडे धुराळा उडाला आहे. या पावसाने जनजीवन विस्कळीत केले.
