मोठी बातमी! “या” नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील ६ भाजप उमेदवारांचा पराभव…..

नांदेड :जिल्हातील (Nanded) लोहा नगर परिषदेच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने (BJP) चक्क एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे, घराणेशाहीवरुन काँग्रेसवर सातत्याने हल्लाबोल करणाऱ्या भाजपाच्या (BJP) भूमिकेवरुन राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगली होती.

लोहा नगरपरिषदेच्या  नगराध्यक्षपदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली. तर, नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली होती.

मात्र, जनतेनं या सर्वांना नाकारले असून घराणेशाहीला थारा नसल्याचं दाखवून लोकांनी दाखवून दिलं. भाजपने एकाच घरातील सहा जणांना तिकीट दिल्याने जिल्ह्यात ही नगरपरिषद चर्चेचा विषय बनली होती. इथे नगराध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.

Leave a Comment