अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 11 नगरपरिषदा आणि 1 नगरपंचायत आहे. या निवडणुकीचा निकाल आज लागला असून जिल्ह्यातील राहाता, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शिर्डी, श्रीगोंदा, जामखेड या सात ठिकाणी भाजपनं बाजी मारली आहे. तर नेवासा व शेवगाव या दोन ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपादचे उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच श्रीरामपूरमध्ये कॉंग्रेस, राहुरीत विकास आघाडीचे व संगमनेरमध्ये सेवा समितीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
_*अहिल्यानगर नगरपालिका निकाल*_
_*राहाता :*_ नगराध्यक्षपदी भाजपचे स्वाधीन गाडेकर विजयी.
_*संगमनेर :*_ नगराध्यक्ष पदी सेवा समितीच्या डॉ. मैथिली तांबे विजयी
*_देवळाली प्रवरा (ता. राहुरी)*_ नगराध्यक्षपदी भाजपचे सत्यजित कदम विजयी
_*पाथर्डी :*_ नगराध्यक्षपदी भाजपचे अभय आव्हाड विजयी.
_*श्रीरामपूर :*_ नगराध्यक्षपदी काँग्रेसचे करण ससाणे विजयी
_*शिर्डी :*_ नगरध्यक्षपदी भाजपच्या जयश्री थोरात विजयी
_*श्रीगोंदा :*_ नगराध्यक्षपदी भाजपच्या सुनिता खेतमाळीस विजयी.
_*जामखेड :*_ नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवार प्रांजल आमित चिंतामणी विजयी
_*शेवगाव :*_ नगराध्यक्षपदी शिंदेंसेनेच्या माया मुंडे विजयी.
_*राहुरी :*_ नगराध्यक्षपदी विकास आघाडीचे भाऊसाहेब मोरे विजयी
_*कोपरगाव :*_ नगराध्यक्षपदी भाजपचे पराग संधान विजयी
_*नेवासा :*_ नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गट करणसिंह घुले विजयी
