संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूरसह परिसरातील गावांमध्ये बिबट्यांची दहशत बघायला मिळत आहे. तसेच बिबट्यांचे परिसरातील काही नागरिकांना दर्शनही झाल आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी केली होती.
त्यानंतर ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे त्या ठिकाणी वनविभागाने उपाययोजना म्हणून साकूरसह परिसरात एकूण ५ पिंजरे लावले होते. यामध्ये मांडवे बुद्रुक येथील डोलनर वस्ती येथे लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात एक पाठोपाठ दोन बिबटे अडकले आहेत. तसेच एक बिबट्या सोबत एक बछाडा देखील पिंजऱ्यात अडकला आहे.
मांडवे बुद्रुक परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली होती. वनविभागाने तातडीने डोलनर वस्ती येथे दहा दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात सोमवार दि. २२ डिसेंबर रोजी एक बिबट्या आणि त्यासोबतच एक बछडा जेरबंद झाला. त्यानंतर या ठिकाणी दूसरा पिंजरा लावण्यात आला. या पिंजऱ्यात मंगळवारी दूसरा बिबट्या जेरबंद झाला आहे. या पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्यांना वनविभागाचे बाळासाहेब फटांगरे, देवराम केदार, बाळू शेंगाळ, लहानू देवके, अशोक जाधव, सय्यद शेख, बंडू कुदनर या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
