मेष : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
मिथुन : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
सिंह : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
तूळ : तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृश्चिक : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. उत्साह आणि उमेद वाढेल.
मकर : मन आनंदी आणि आशावादी राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
मीन : संततिसौख्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
