मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनसामान्यांशी निगडित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत चार महत्त्वाच्या घोषणा करण्यात आला.
यात अगदी नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेवर घेण्याबाबत मोठा निर्णय झाला आहे. आजच्या बैठकीत प्रामुख्याने नगरपरिषद प्रशासन, ग्रामीण आरोग्य सेवा आणि महापुरुषांच्या स्मारकांसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या.
आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या अखेर नियमित
ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा कणा असलेल्या आरोग्य सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याचा निर्णय ग्रामविकास व पंचायत राज विभागाने घेतला आहे.
