लाडक्या बहिणींना खुशखबर! ‘या’ दिवशी खात्यात ₹४५०० जमा होणार….

डिसेंबर महिना संपत आला आहे. अजूनही नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांना पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. नोव्हेंबरनंतर डिसेंबरचाही हप्ता बाकी आहेत. त्यात आता जानेवारी महिना सुरु होईल. त्यामुळे तिन्ही महिन्याचे पैसे कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. दरम्यान, आता नवीन वर्षातच महिलांना खुशखबर मिळू शकते. महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.

नवीन वर्षात लाडक्या बहि‍णींना मिळणार पैसे

नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे २ दिवस उरले आहेत. या नवीन वर्षात महिलांच्या खात्यात नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जमा होईल, असं सांगितलं जात आहेत. त्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यात आता जानेवारीचाही हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे महिलांना पुढच्या महिन्यात खरंच ४५०० रुपये मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

या दिवशी येऊ शकतात पैसे 

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात १४ जानेवारीपूर्वी पैसे येऊ शकतात. मकरसंक्रांतीचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे नवीन वर्षात महिलांना चांगलाच फायदा होणार आहे.

केवायसी करण्याची शेवटची तारीख

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर म्हणजे उद्या आहे. जर महिलांनी त्यापूर्वी केवायसी केली नाही तर त्यांचा लाभ बंद केला जाईल. याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे

Leave a Comment