मेष – कोणत्याही कामात अधिरता ठेवल्यास भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. संयम ठेवा.
वृषभ – महत्वाची बातमी कळेल. कोर्टकेसमध्ये यश मिळविण्याचा प्रयत्न करता येईल.
मिथुन – आर्थिक व्यवहारात लाभ होईल. जुने येणे वसूल करा. प्रेमाला चालना देणारी व्यक्ती सहवासात येईल.
कर्क – मनाची द्विधा अवस्था कमी होईल. मोठी खरेदी झाल्याने आनंद वाटेल. मान-सन्मानाचा योग येईल.
सिंह – शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. तुमचे कठोर शब्द इतरांना दुःख देऊ शकतात.
कन्या – दृढ निश्चयाने एखादे काम करता येईल. शत्रूला चोख उत्तर देता येईल. वरिष्ठांना वश करता येईल.
तूळ – महत्वाच्या व्यक्तीची भेट होईल. धंद्यात लाभ होईल. मान-सन्मानाचा योग येईल. मौजमजेत वेळ जाईल.
वृश्चिक – उत्साहवर्धक फोन येईल. कामाच्या उत्साहात दिवस जाईल. व्यस्त राहता येईल.
धनु – प्रमाणाबाहेर काम करण्याच्या स्वभावाने थकवा जाणवेल. स्वच्छ हवेत फेरफटका मारा.
मकर – जीवनाला कलाटणी मिळेल.घरात आनंदी वातावरण राहील. संततीबद्दल विचार कराल.
कुंभ – तुमच्याबद्दल गैरसमज करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. धंद्यावर लक्ष द्या. आळस महागात पडेल.
मीन – मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. मौजमजेत वेळ जाईल. निसर्गाच्या सहवासात मन रमेल.
