नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात, संगमनेरचा तरूण ठार

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथिल रहिवासी असलेला आदित्य सोमनाथ उंबरकर (वय 24) याचा सोमवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भिषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

आदित्य सोमनाथ उंबरकर हा उच्च शिक्षित तरुण होता. तो घोटी येथिल रुग्णालयात कार्यरत होता. नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावरून सोमवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास आदित्य घोटीच्या दिशेने चालला होता.

यावेळी सिन्नर तालुक्यातील बेल्हू फाट्याजवळ समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या आदित्यला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र अपघात इतका भिषण होता की, उपचारापूर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Comment