राष्ट्रवादी पक्ष गमावलेला राष्ट्रीय दर्जा मतांची टक्केवारी वाढवून परत मिळवण्यासाठीच मैदानात उतरलेला आहे. त्यांची सध्या भाजपसोबत बोलणी सुरू आहेत. त्याबद्दलच्या घडामोडी पाहयला मिळत आहेत.
त्यामुळे भविष्यात हा पक्ष आमच्या सोबत किती काळ असेल हे सांगू शकत नाही असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निपाणी मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार काका पाटील यांच्या कोगनोळी येथील प्रचार सभेमध्ये केला.
