संगमनेर (DSNews24 /किरण पुरी ) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. बारामतीत जेव्हा अजितदादांना अखेरचा निरोप देण्यात आला होता त्यावेळी संगमनेर तालुक्यातील साकूर येथे त्यांच्या स्मृतीला एक अनोखी, हृदयस्पर्शी आणि पर्यावरणस्नेही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच अजितदादा कायमच आठवणीत राहावे यानिमित्ताने साकुरमधील खंडोबाचा डोंगर, विद्या प्रबोधिनी शैक्षणिक संकुल या ठिकाणी तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत अशोकराव खेमनर यांच्या घरी वृक्षारोपण करण्यात आले. हे वृक्षारोपण केवळ एक कार्यक्रम नव्हता तर अजितदादांच्या विकासकामांना, शेती-शिक्षण – पर्यावरणासाठीच्या त्यांच्या दूरदृष्टीला सलाम करण्याचा भावपूर्ण प्रयत्न होता.
या अनोख्या उपक्रमावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत अशोकराव खेमनर, युवा नेते अनमोल शंकरराव खेमनर , सरपंच सचिन सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य निसार पटेल, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब सागर, सुदाम सागर, दादाभाऊ खेमनर, संजय देवगिरे, युवा नेते बाळासाहेब सागर, ग्रामपंचायत कर्मचारी गणपत पवार, उमेश गाडेकर, झाडांची निगा राखणारे आनंदा गाडेकर, मुख्याध्यापक सुभाष घुगरकर, प्राचार्या गुलशन जमादार तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच साकुर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मातृभूमीला हिरवीगार करताना अजित दादांच्या स्मृतीला वंदन केले. “दादांनी नेहमीच पर्यावरण, शेती आणि शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या स्मृती आठवणीत राहाव्या यासाठी रोप लावल, ते त्यांच्या कार्यासारखेच सदैव वाढत राहील आणि छाया देईल,” अशी भावना वृक्षारोपण करताना होती.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती – शंकरराव खेमनर
अजितदादांना ही श्रद्धांजली फक्त फुलं किंवा माळांची नव्हती, तर जीवन देणाऱ्या वृक्षांची होती. जी दादांच्या जीवन दर्शना सारखीच अमर राहील. साकुर गावाने दाखवून दिले की, खरी श्रद्धांजली म्हणजे शब्दांत नव्हे, तर कृतीतून व्यक्त होणारी भावना असते.अजित दादा पवार यांच्या स्मृतीला कोटी कोटी वंदन. त्यांचे कार्य, त्यांची दूरदृष्टी आणि त्यांची लोकांप्रतीची आस्था कायम राहो, यासाठीच आज सकुरमध्ये हे वृक्षारोपण करण्यात आले आहे..
थोरात कारखान्याचे संचालक – इंद्रजित खेमनर
