संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. छबुबाई विठ्ठल ढेंबरे यांच अल्पशा आजाराने निधन झाल आहे. वार – गुरूवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी छबुबाई ढेंबरे यांनी राहत्या घरी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांचं मृत्यूसमयी ७० वय होतं. त्यांच्या पश्चात पती विठ्ठल धोंडीबा ढेंबरे, मुलगा नवनाथ विठ्ठल ढेंबरे तसेच सीमा कैलास ढेरंगे, मिरा बाबुराव मोढवे, छाया पोपट भोसले, अर्चना योगेश घेमूड या चार मुली, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. छबुबाई ढेंबरे यांच्या निधनाने ढेंबरे कुटुंबांसह संपुर्ण बिरेवाडी पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.
छबुबाई यांची कुटुंबात एक मनमिळावू माता अशी ओळख होती. पती विठ्ठल ढेंबरे यांच्या खांद्याला खांदा लावून छबुबाईंनी संसार फुलवला. तसेच मुला मुलींना शिक्षण देऊन त्यांच पुढील संसार फुलवला. परंतु आज छबुबाई यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर मुलगा व मुलींच मातृत्व हरपले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. मात्र नियतीनेपुढे कुणाचेही चालत नसल्याने छबुबाई यांना अखेरचा निरोप घ्यावा लागला आहे.
बिरेवाडी येथील गावठाणमधील स्मशानभूमीत आज सायंकाळी ४ वाजता छबुबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
