मोठी बातमी! शरद पवार पुन्हा रूग्णालयात दाखल 

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून ही माहिती दिली असून, पवारांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्त्यांना अपडेट दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आज त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्स अॅप स्टेट्स ठेवत शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.

काही दिवसांपूर्वी पवारांचा १० दिवसांचा औषधांचा कोर्स पूर्ण झाला होता. त्यानंतरची पुढील तपासणी करण्यासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे. हे रुटीन चेकअप असल्याचे सांगण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडे त्यांना अशक्तपणा जाणवू लागल्याने तसेच अन्नप्राशन व्यवस्थित होत नसल्याचे समोर आले. त्यानंतर डॉक्टरांनी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना सलाईन लावण्यात येणार असून आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सुप्रिया सुळे यांनी काय म्हटले?

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती एकदम व्यवस्थित असून काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नाही. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना रुबी हॉलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. काही फॉलोअप चाचण्या आणि काहीसा अशक्तपणा जाणवत असल्याने शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले

Leave a Comment