भाजपमध्ये मोठे फेरबदल, सुजय विखे, नवनाथ बनसह “या” दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपरिषद, महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांत भाजपला मोठे यश मिळाले. या निवडणुकीत भाजपने आखलेली रणनिती या यशामागचे महत्वाचे कारण सांगितले जाते.

आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामपंचायत वगळता निवडणुका नाहीत. असे असताना भाजपमध्ये मोठे फेरबदल करत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे प्रेदशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांचा समावेश आहे.

काही महिन्यांपूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु झाल्या. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणी व पदाधिकारी नेमणूक या निवडणुकीनंतर करावी, असा निर्णय प्रमुख पदाधिकारी नेत्यांनी घेतला. मला अत्यानंद होतोय की आज राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन, अमित शाह, बी एल संतोष, शिव प्रकाश व सर्व नेत्यांनी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह मी पदाधिकारी नेमणुकीबाबत चर्चा केल्याचे रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या पदाधिकाऱ्यांमध्ये मुख्य प्रवक्ता म्हणून भाजपकडून नवनाथ बन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष म्हणून १० जणांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजप सरचिटणीस म्हणून ६ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप चिटणीस म्हणून ११ जणांना संधी मिळाली आहे. यासोबतच भाजप युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कृष्णराज महाडिक, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ आणि भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर कोषाध्यक्ष म्हणून मिहिर कोटे यांच्यावर जबाबदारी असणार आहे.

या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रत्येकाने पक्षाच्या वाटचालीतील योगदान हे वर्षानुवर्षे आहे याची कल्पना आहे. परंतु प्रदेश पदाधिकारी करताना अत्यंत मर्यादित संधी देता येते. अशावेळी ज्याला संधी मिळते, त्यांचे अभिनंदन सर्वजण करतात, पण या घोषणा करताना ज्यांची नेमणूक होईल, त्यांच्या व्यतिरिक्त असे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत, असे महत्वाचे विधान केले आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे

मुख्य प्रवक्ता – नवनाथ बन

भाजप प्रदेश उपाध्यक्ष

अतुल काळसेकर

भारती पवार

संजय कोरगे

संजय भेंडे

रामदास कडस

केशव उपाध्ये

गोपीचंद पडळकर

प्रिया शिंदे

सुजय विखे पाटील

अर्चना पाटील चाकूरकर

 

भाजप सरचिटणीस

निरंजन डावखरे

संजय कुटे

माधवी नाईक

राजेश पांडे

सुनिल राणे

योगेश सागर

 

भाजप चिटणीस

मंगेश चव्हाण

संजय कुटे

परिणय फुके

वर्षा डहाळे

संजय जगताप

अर्चना डेहणकर

रोहिणी नायडू

राम सातपुते

प्रविण घुगे

रेखा कुलकर्णी

भैरवी घाक

भाजप युवा मोर्चा अध्यक्ष– कृष्णराज महाडिक

भाजप महिला मोर्चा अध्यक्ष– चित्रा वाघ

भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष– योगेश टिळेकर

कोषाध्यक्ष – मिहिर कोटेचा

Leave a Comment