महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलं… राज्यसभेसाठी शरद पवारांचा अर्ज दाखल पण….

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. 7 जागांसाठी केवळ 7 उमेदवारांचे अर्ज आल्यानं निवडणूक बिनविरोध होणार आहे.

पण, या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा एक प्रकार घडला आहे. ६ उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे जाऊन अर्ज भरला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी घरी जाऊन अर्ज भरला आहे. राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलं आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार, ज्योती वाघमारे आणि पार्थ पवारांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान अर्जांची छाननी झाल्यानंतर औपचारीक घोषणा होण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया ईवनाते आणि रामराव वडकुतेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप उमेदवारांचा अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे इतर नेते हजर होते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ज्योती वाघमारेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

घरी पोहोचले निवडणूक अधिकारी

तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा अर्ज दाखल केला आहे. शरद पवार हे अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात येऊ शकले नाही. तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार हे अर्ज दाखल करण्यासाठी आले नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी घरी जाऊन निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली आहे. जे जे हॉस्पिटलचे अधीक्षक यांनी यावेळी शपथ दिली. आजारी व्यक्ती अर्ज दाखल करण्यासाठी आला नाही, अशी ही राज्यातील पहिलीच घटना आहे. शरद पवारांचा अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि इतर मविआ नेते उपस्थित होते. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांनी उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या

Leave a Comment