युद्धाचा मोठा झटका! घरगुती गॅस सिलिंडर तब्बल “एवढ्या” रूपयांनी महागला

नवी दिल्ली: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. ७ मार्च, शनिवारपासून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची, तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. एप्रिल २०२५ नंतर पहिल्यांदाच गॅसच्या किमतीत इतकी मोठी वाढ झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या गॅसच्या किमती अचानक वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. नवीन दर आजपासूनच लागू झाले आहेत. दिल्लीप्रमाणेच मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांमध्येही किमतीत वाढ झाली असून स्थानिक टॅक्सनुसार ही किंमत थोडीफार वेगळी असू शकते.

केवळ घरगुतीच नाही, तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या खाद्य विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसणार असून, परिणामी बाहेरचे खाणेही महाग होऊ शकते.

Leave a Comment