संगमनेर – विद्यार्थीनीवर ॲसिड हल्ला ; पालकमंत्री विखेंनी घेतली दखल, आ.अमोल खताळांनी थेट विधानसभेत….

संगमनेर(DSNews24) शालेय विद्यार्थीनीच्या चेहर्यावर ॲसिड फेकण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर असून पोलीसांना याबाबत तपासाच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

वडगावपान येथे शालेय विद्यार्थ्यानीवर अॅसिड फेकल्याच्या घटनेची दखल घेवून पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण रूग्णालयात विद्यार्थीनीला सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे यांना घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.

सदर विद्यार्थीनी आपल्या नातेवाईकांकडे राहात होती.घटना ज्या भागात घडली तिथे सीसीटिव्ही कोणतीच व्यवस्था नाही.तरीही पोलीसांनी विशेष पथक नेमून आरोपीचा तपास करावा असे निर्देश आपण दिले असून शासनाच्या वतीने विद्यादर्थीनीला मदत मिळवून देण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

दरम्यान आ.अमोल खताळ यांनी विधानसभेत या घटनेचा विषय उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. यावर महीला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी घटनेची माहीती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घेतली असून या विद्यार्थीनीला सर्व मदत करण्याची ग्वाही सभागृहात दिली.

Leave a Comment