आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता.

वृषभ : आरोग्य उत्तम राहाणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : आर्थिक बाबतीत अडचणी राहाणार आहेत. मोठ्यांचे सहकार्य लाभणार नाही.

कर्क : आरोग्य उत्तम राहाणार आहे. अनेकांशी सुसंवाद साधाल.

सिंह : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. जबाबदारी वाढणार आहे.

कन्या : अनेक गोष्टी धाडसाने व धडाडीने कराल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

तुळ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.

वृश्‍चिक : आत्मविश्‍वास वाढणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल.

धनु : मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. खर्च वाढणार आहेत.

मकर : आर्थिक लाभ होतील. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

कुंभ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मनोबल वाढेल.

मीन : तुमच्या कार्यात तुम्हाला चांगली संधी लाभणार आहे. तुमचे निर्णय बरोबर येतील.

Leave a Comment