शिर्डीतील हॉटेलमध्ये सुरू होता भलताच प्रकार, पोलिसांनी बनावट….

अहमदनगर – पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शिर्डी येथील तब्बल सहा बड्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाई सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

हॉटेलमधून १५ पिडित मुलींची सुटका करण्यात आली असून, ११ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री केली.

शिर्डी शहर व परिसरातील काही हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारामाफत उप अधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. या माहितीच्या अधारे पोलिसांच्या पथकाने शिर्डी येथे जावून सहा हॉटेलमध्ये छापे टाकत १५ पिडित मुलींची सुटका केली.

याप्रकरणी ११ आराेपींना अटक करण्यात आली असून, आरोपीविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरिक्षक विलास पुजारी, शिवाजी डोईफोडे, मेघशाम डांगे आदींच्या पथकाने केली.

Leave a Comment