एकनाथ शिंदेंना गुवाहाटीचा मार्ग अशोक खरातनेच दाखवला, “या” बड्या नेत्याच खळबळजनक वक्तव्य 

नाशिक येथील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरण राज्यात चर्चेत आहे. खरातच्या घृणास्पद कृत्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे. त्याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता राज्य शासनाने एसआयटी या विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकाच्या प्रमुख म्हणून पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्याने खळबळजनक विधान केले आहे.

एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीचा मार्ग अशोक खरात यानेच दाखवला होता, असे खळबळजनक विधान शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता विनायक राऊत यांनी केलेल्या दाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणारे याकडे लक्ष असणार आहे.

अशोक खरातसमेवत रुपाली चाकणकर यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्या अडचणी सापडल्या. परिणामी त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. यातच अनेक राजकीय नेत्यांचे फोटोही अशोक खरात सोबत व्हायरल होत आहेत. शिवसेना (शिंदे) पक्षाचे मंत्री दीपक केसरकर यांचा देखील अशोक खरातसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यांचीही एसआयटी चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले विनायक राऊत?

माजी मंत्री दीपक केसरकर यांची एसआयटी चौकशी व्हायला पाहिजे. तसेच खरात यांच्याकडे जाणारी वाट दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांना दाखवली आणि खरात याने शिंदेना गुवाहाटीची वाट दाखवली. खरात जेव्हा तोंड उघडेल तेव्हा मंत्री मंडळातले अर्धे मंत्री उघडे पडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी आणि कलंकित नेत्यांची चौकशी करून त्याना काढून टाकावे. कोणत्याही दबावाला बळी न पडता खरात याची चौकशी सुरु ठेवावी.

Leave a Comment