अशोक खरातच कांड उघड करणाऱ्या मास्टरमाईंडचा फोटो समोर 

नाशिक : नाशिकसह अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडवणाऱ्या ‘कॅप्टन फाईल्स’ अशोक खरात प्रकरणातील सर्वात मोठा आणि धक्कादायक कृत्याचा सूत्रधार दुसरा कोणी नसून संशयित अशोक खरातसोबत राहणारा ऑफिस बॉय नीरज जाधव असल्याचं उघड झालं आहे.

त्याच ओजस प्रॉपर्टीजच्या बंद दाराआड 100 हून अधिक महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ करून आपल्याच मालकाला 5 कोटींच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या या मास्टरमाइंडचा फोटो आता समोर आला आहे.

नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील ओजस प्रॉपर्टीज या कार्यालयाच्या भिंतींआड सुरू असलेल्या वासनांध खेळाचा पडदा आता फाटला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अशोक खरात याच्या मर्जीतील ऑफिस बॉय नीरज जाधव हाच या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं आहे. नीरजने केवळ खरातच्या दुष्कृत्यांचे व्हिडिओच केले नाहीत, तर त्याआधारे खरातलाच 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

एखाद्या सिनेमाला शोभेल अशी गुप्तता पाळत आणि नियोजनबद्ध पद्धतीने कॅप्टन अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली असल्याचं समोर आलं आहे. या कारवाईदरम्यान खरात याला अटक करणाऱ्या पोलिसांनाच संतापात भोंदू खरात याने शाप दिल्याची संतापनक माहिती देखील समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

कॅप्टन खरात ऑपरेशन राबविताना पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती. ही संपूर्ण कारवाई इतकी गोपनीय होती की, या कारवाईदरम्यान सहभागी असलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांनाही आपण नेमकं कोणाला पकडण्यासाठी जात आहोत? याची पुसटशी कल्पना देखील नव्हती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगून पोलिसांची 5 पथक तयार करण्यात आली होती. हातात लाठ्या आणि हेल्मेट परिधान करून मोहिमेत सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोहिमेच्या शेवटपर्यंत माहिती नव्हती. ज्याठिकाणी ही कारवाई करायची होती त्याठिकाणी पोहोचल्यावर ‘चोर शिरल्याचा बनाव’ करत पोलिसांनी सापळा रचला आणि अचानक अशोक खरात उर्फ कॅप्टन याला ताब्यात घेतलं. या घटनेमुळे संपूर्ण नाशकात संतापाची लाट पसरली आहे.

Leave a Comment