मेष : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मिथुन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
सिंह : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कन्या : धार्मिक कार्यात सहभाग होईल. मनोबल उत्तम राहील.
तूळ : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.
वृश्चिक : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
धनू : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.
मकर : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल
