कॉंग्रेससाठी मोठी बातमी! पाचपैकी “एवढ्या” राज्यात मिळणार सत्ता, एक्झिट पोलमधून धक्कादायक अंदाज 

देशातील पाच राज्यांतील मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमध्ये यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे कुणाला सत्ता मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.

तमिळनाडूत कुणाचा वरचष्मा?

तमिळनाडूमध्ये सत्ताधारी डीएमकेला मागील निवडणुकीच्या तुलनेत काहीसा फटका बसताना दिसत असला तरी पुन्हा एकदा सत्ता मिळू शकते, असे एक्झिट पोलच्या आकड्यांवरून दिसते. डीएमकेसोबत काँग्रेसही आघाडीत आहे.विविध संस्थांच्या एक्झिट पोल्सनुसार, तमिळनाडूत डीएमके आघाडीला १२८ तर एनडीएला केवळ ८६ जागांवर समाधान मानावे लागू शकते. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षालाही १७ जागा मिळतील अंदाज वर्तविण्यात आला आहे.

केरळमध्ये काँग्रेसची सत्ता

पोल ऑफ पोल्सनुसार, केरळमध्ये दहा वर्षांनंतर पुन्हा काँग्रेसची सत्ता येऊ शकते. काँग्रेसप्रणित यूडीएफला ७६ तर एलडीएफला ६० जागा मिळण्याचा अंदाज आहे. राज्यात भाजपला मागील निवडणुकी भोपळाही फोडता आला नव्हता. यावेळी भाजपला तीन जागा मिळताना दिसत आहेत.

आसाममध्ये पुन्हा भाजप

आसाममध्ये भाजपला पुन्हा सत्ता मिळताना दिसत आहे. राज्यात भाजपला पोल ऑफ पोल्सनुसार, तब्बल ९२ जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. तर काँग्रेसला केवळ २८ जागांवर समाधान मानावे लागू शकते. आसाममध्ये काँग्रेसने जोरदार प्रचार केला होता. पण पुन्हा सत्ता काबीज करण्याचे स्वप्न धुळीस मिळताना दिसत आहे.

बंगालमध्ये इतिहास घडणार

पश्चिम बंगालच्या निवडणकीत सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. राज्यात भाजप इतिहास घडविण्याची शक्यता आहे. पोल ऑफ पोल्सनुसार, बंगालमध्ये भाजप पहिल्यांदाच सत्ता काबीज करू शकते. भाजपला १५० हून अधिक जागा मिळतील असा अंदाज आहे. तृणमूल काँग्रेसही टक्कर देताना दिसत आहे. टीएमसीचे १४० उमेदवार निवडून येऊ शकतात, असा अंदाज आहे.

पुदुच्चेरीत एनडीए

पुदुच्चेरीमध्ये पुन्हा एनडीएला सत्ता मिळेल, असा अंदाज आहे. पोल ऑफ पोल्सनुसार, राज्यात एनडीएला १८ जागा मिळू शकतात. तर काँग्रेस केवळ नऊ जागांपर्यंतच मजल मारू शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे

Leave a Comment