अहिल्यानगर जिल्ह्यात आचारसंहिता लागू, निवडणूकीची रणधुमाळी…

अहिल्यानगर – 1 जानेवारी 2022 पासून रिक्त असणार्‍या नगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. निवडणूक जाहीर होताच नगर जिल्ह्यात निवडणुकीसाठी मतदान होवून निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे जिल्ह्यात आता कोणतीच्या नवीन विकास कामे, धोरणात्मक निर्णय याची घोषणा करता येणार नाही.

नगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर झाली या निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान होवून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत नगर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू राहणार आहे

Leave a Comment