शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दणका, ‘ती’ नियुक्ती बेकायदेशीर

Maharashtra Political Crisis एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) पक्षनेते पदावरून हटवण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून मंजूर करण्यात आला होता.

अध्यक्षांना 3 जुलै रोजी पक्षातील फुटीबाबत माहिती होती. दोन प्रतोद आणि नेत्यांच्या नियुक्तीचा मुद्दा अध्यक्षांना फुटीबाबत माहिती होण्यासाठी पुरेसा होता. पण अध्यक्षांनी त्यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला नाही.

अध्यक्षांनी यासंदर्भात स्वतंत्र चौकशी करायला हवी होती. पण या प्रकरणात अध्यक्षांनी गोगावलेंना (Bharat Gogawale) मुख्य प्रतोद म्हणून मान्यता देणं अवैध होतं असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud) यांनी नमूद केलं आहे.

Leave a Comment