ब्रेकिंग! नांदूर खंदरमाळ येथे लिंबाच्या झाडावर वीज कोसळली, ८ ते १० शेतमजूर….

संगमनेर( DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठार भागात आज वादळी वाऱ्यासह मान्सूनपुर्व पावसाने अक्षरशः थैमान घातले. या पावसात हिवरगाव पठार व नांदूर खंदरमाळ या दोन ठिकाणी बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. हिवरगाव पठार शिवारातील गिऱ्हेवाडी येथे वीज कोसळून आदिवासी बांधव मच्छिंद्र झुंबर दुधवडे यांचा दुर्देवी मृत्यू झाला तर नांदूर खंदरमाळ येथील करंजेकर वस्ती येथील माजी सरपंच मधुकर विठ्ठल करंजेकर यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर वीज कोसळली. मात्र दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळलाय.

अधिक माहिती अशी की, साकूर पठारभागात बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह मान्सूनपुर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. यादरम्यान नांदर खंदरमाळ येथील करंजेकर वस्तीवर माजी सरपंच मधुकर विठ्ठल करंजेकर यांच्या शेतातील टोमॅटो बांधणीचे काम चालू होते. पावासमुळे ८ ते १० शेतमजूर जवळील ५० फुट अंतरावर असलेल्या शेडमध्ये आसरा घेण्यासाठी थांबले होते. यावेळी अचानक एकच वीजेचा मोठा आवाज झाला आणि शेतातीलच लिंबाच्या झाडावर वीज कोसळली. यामध्ये लिबांचे झाड अक्षरशः सोलून निघाले होते. मात्र दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.

Leave a Comment