संगमनेर(DSNews24) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कु. अश्विनी कमल किसनराव पुरी हिला “ज्ञानदीप सामाजिक विकास संस्थेच्या वतीने ‘राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२६ चा उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व इंदू मिल स्मारकाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते नाशिक येथे प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्कार वितरणवेळी रिपब्लिकन सेनेचे युवा नेते ॲड. अमन आंबेडकर, राज्य प्रवक्ते अविनाश शिंदे, नाशिकचे पोलिस आयुक्त संदिपजी कर्णिक, समाज कल्याणचे उप आयुक्त भगवानजी वीर, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेशजी गायकवाड, नाशिक मनपाचे सहायक उपायुक्त नानासाहेब साळवे, रिअल स्टार आसावरी बर्वे आदि मान्यवर उपस्थित होते.
साकूरजवळील बिरेवाडी येथील कु.अश्विनी पुरी ही रहिवासी आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना तीने नाशिकमध्ये पत्रकार क्षेत्रात निःपक्ष निर्भीड वृतनिवेदिका करत आपल्या लेखणीच्या आधारे गगन भरारी घेऊन लोकाभिमुक समाजाच्या न्याय हक्कासाठी तात्काळ उभे राहून सामाजिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर राहून आपल्या पत्रकारिता क्षेत्रात भक्कम पाया उभा केला आहे. अत्यंत कमी वयात अश्विनीने हे यश मिळविले आहे. तसेच पत्रकार क्षेत्रात आणि वृत्तनिवेदिका म्हणून तीने आगळा वेगळे नावलौकिक मिळविला आहे.
आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, संस्कृतीक, क्रीडा, क्षेत्रात केलेल्या समाजसेवेच्या आधारे आजपर्यंत कार्यगौरव, बेस्ट न्यूज ॲंकर, बेस्ट व्हाॅईस आर्टीस्ट, स्त्री शक्ती महिला सन्मान, नवदुर्गा, समाज रत्न, छावा गौरव, कर्तव्यदक्ष महिला, समाजभूषण, महाराष्ट्र पत्रकार रत्न, नारि शक्ती, श्री शक्ती, राष्ट्रीय रत्न, सुवर्ण रत्न, राज्यस्तरीय महिला रत्न, महाराष्ट्र पत्रकार दीपस्तंभ, नवरात्री आयकॉन, राज्यस्तरीय जीवनगौरव, महाराष्ट्र रत्न, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव, शौर्य रत्न, राजमाता जिजाऊ असे विविध पुरस्कार कु. अश्विनी पुरी हिला मिळाले आहेत. तसेच कु. अश्विनी पुरी ही व्हाईस ऑफ मिडिया डिजीटल विंगच्या प्रदेशाध्यक्षपदावर काम करत आहे. तसेच विविध सामाजिक संघटनेत देखील विविध पदांवर ती काम करत आहे.
अश्विनी पुरी हिच्या याच कार्याची दखल घेत ज्ञानदीप सामाजिक विकास संस्थेच्या वतीने तीचा गौरव केला आहे. उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून अश्विनी पुरी हिला पुरस्कार मिळाल्याबद्दल साकूर पठारभागासह, संगमनेर, अहिल्यानगर व गोसावी समाज बांधव तसेच विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.
