Manoj Sansare : महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे नेते, माजी नगरसेवक मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.
महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि राज्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. दलित पँथरचे नेते भाई संगारे यांचे निकटवर्तीय म्हणून मनोज संसारे यांची ओळख होती.
मनोज संसारे यांची झुंजार नेते म्हणून लोकांमध्ये ओळख होती. संसारे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष’ स्थापन केला होता. मनोज संसारे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे.
मनोज संसारे गेल्या वर्षभरापासून आजारी होते. मनोज संसारे हे मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक होते. तसेच ‘युथ रिपब्लिकन पार्टी’चे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
