संगमनेरकडे जाताना भीषण अपघात ; पती ठार, पत्नी अत्यवस्थ

कोपरगाव तालुक्यातील जवळके-धोंडेवाडी चौफुलीवर कंटेनर व मोटारसायकलचा अपघात झाला असुन या अपघातात पती जागेवरच ठार झाले.

तर पत्नी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असुन त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. ही घटना शनिवारी सकाळी साडेआठवाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत मिळालेली माहीती अशी कि, राहता तालुक्यातील जळगाव येथील अशोक विठ्ठल गुंड (वय-५८) व पत्नी शोभा अशोक गुंड (वय-५३) हे संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे नातेवाईकाकडे मोटारसायकलवर (क्रमांक-एम.एच.१७ एन ३७१०) जात असतांना कोपरगाव संगमनेर रस्ता क्रास करतांना जवळके चौफुलीवर भरघाव वेगाने जाणा-या आयशर कंपनीच्या कंटेनरने(क्रमांक- एम.पी.०९ जी.जे.०१२१ ) मोटारसायकलला जोराची धडक दिली.

दोघांनाही स्थानिकांनी शिर्डी येथे साईबाबा हॅास्पीटलमध्ये दाखल केले. परंतु अशोक गुंड हे जागेवरच ठार झाले होते. तर त्यांच्या पत्नी शोभा ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर तेथे उपचार करुन पुढील उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment