शिर्डी (DSNews24 ) भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या ‘युवा जागर यात्रा’ निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर अहिल्यानगरच्या वतीने आयोजित युवा संवाद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आणि भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भाजयुमो उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी यांनी युवकांची राजकारणातील सक्रिय भागीदारी, समाजातील विविध प्रश्न सोडविणे, पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे तसेच शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवा मोर्चा सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. भविष्यातही अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटन बळकट करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. तर प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी ‘युवा जागर यात्रा’ मागील संकल्पना, युवा मोर्चाची भूमिका आणि आगामी कार्याची दिशा स्पष्ट केली.
यावेळी शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक पवार, शिर्डी शहराध्यक्ष रवी गोंदकर, भाजप उपाध्यक्ष किरण बोराडे, भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर, उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी, मंडल अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
