अबब… सासूरवाडीत गेलेल्या जावयाने केल भलतच अस काही, एकच खळबळ

छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar)वैजापूर तालुक्यातील भटाणा धरणात एका व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्या (Sucide) केल्याची घटना सोमवारी (15 मे) रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नामदेव श्रावण सोनवणे (वय 32 वर्षे) असे मृताचे नाव असून ते भटाणा येथील जावई असल्याचे समजते. याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नामदेव यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव सोनवणे यांची भटाणा ही सासरवाडी आहे. त्यांनी सोमवारी धरणामध्ये उडी घेवून आत्महत्या केली. दरम्यान, आज सकाळी प्रेत तरंगत असल्याची माहिती शिऊर पोलिसांना मिळाली.

घटनेची माहिती मिळताच सपोनि संदीप पाटील, फौजदार तिलौकचंद पवार, जमादार संभाजी आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने प्रेत पाण्याबाहेर काढले. मयतावर शिऊर येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून, प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

सोनवणे यांनी सासुरवाडीत येऊन आत्महत्या का? केली याचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास शिऊर पोलिसांकडून केला जात आहे.

Leave a Comment