संगमनेर (Sangamner) तालुक्यातील वरंवडी येथील रेश्मा नानासाहेब पोपळघट (वय 27) या महिलेचा नेवासे तालुक्यातुन परतत असतांना झालेल्या विचित्र अपघातात (Accident) दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वरंवडी येथिल नानासाहेब पोपळघट व रेश्मा पोपळघट हे दाम्पत्य कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास होते. रविवारी नेवासे तालुक्यात आप्तेष्टाचे लग्न होते. त्यामुळे हे दापत्य लग्नासाठी आले होते.
रविवारी लग्नसोहळा आटपून अँपेरिक्षाने खडका-सलाबतपूर रस्त्यावरुन येत असताना हॉटेल वैभव समोर ही अँपेरिक्षा पलटी झाली. त्यामुळे रिक्षात बसलेल्या रेश्मा या डोक्यावर पडल्यामुळे जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.
तर त्याच्या समवेत असलेले पती व आई तसेच वडील यांना मुक्कामार लागल्याची माहिती मिळाली आहे.
