संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा (फाटा) येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सहा वर्षीय वयाचा बिबट्या जागीच ठार झाला आहे. ही घटना शुक्रवार( ता.१९) मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की,शुक्रवारी रात्री हिवरगाव पावसा फाटा येथे बिबट्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना त्याच दरम्यान अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली, त्यामुळे बिबट्या जागीच ठार झाला.
