मोठी बातमी! महाराष्ट्रावर तिहेरी संकट, पुढील काही तास महत्त्वाचे….

मुंबई – राज्यातील वातावरणात काही दिवसांपासून बदल होताना दिसून येत आहे. कुठे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, तर काही भागांत तापमानाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविलेला आहे.

मुंबई, रायगड, पालघर आणि ठाणे येथे उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात 10 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढे नमूद करण्यात आला आहे.

कोकण

कोकणात पालघर, ठाणे, रायगड येथे उष्ण दमट हवामानाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. रत्नागिरीत उष्ण दमट आणि दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता असून यलो अलर्ट आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटीसह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार या जिल्ह्यात कोरडे हवामान राहील अशी शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत कोरडे हवामान राहील असा अंदाज आहे. कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि सांगलीत गडगडाटीसह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

विदर्भ

अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.

Leave a Comment