पुणे हादरले… कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्याने पतसंस्थेच्या कार्यालयातच घेतला गळफास…

पुणे : पुणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी विकास टिंगरे (Vikas Tingare) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

विकास टिंगरे यांनी धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर असलेल्या त्यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

विकास टिंगरे हे पुणे शहर काँग्रेसचे विश्रांतवाडी ब्लॉक अध्यक्ष होते. टिंगरे हे नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात आले होते. ते दुपारी जेवले नसल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन पाहिल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांना तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच विमानतळ पलिसांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, टिंगरे यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

विकास टिंगरे यांनी गळफास घेतल्याचे समजल्यानंतर त्यांना तात्काळ नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, विकास टिंगरे यांनी आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

Leave a Comment