महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result) गुरुवारी ऑनलाईन जाहीर झाला आहे.
यात नगर जिल्ह्याचा (Ahmednagar District) निकाल 92.63 टक्के लागला असून सर्वाधिक निकाल हा शास्त्र विभागाचा (Science) 96.98 आहे.
त्याखालोखाल वाणिज्य विभागाचा (Commerce) 93.62 टक्के असून कला विभागाचा (Arts) सर्वात कमी 83.57 टक्के आहे.
तालुकानिहाय निकालात 97.39 टक्के निकाल हा शेवगाव तालुक्याचा असून सर्वात कमी निकाल हा श्रीरामपूर तालुक्याचा 87.82 टक्के आहे. यंदा देखील नगर जिल्ह्यात उत्तीर्णामध्ये मुलांनीच बाजी मारल्याचे चित्र आहे
