राज्यातील काही जिल्ह्यांना आज (दि.०४जून) वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात सुसाट्याच्या वारा, विजांच्या कडकडाटांसह वादळी पाऊस (Rain forecast) पडणार असल्याचे देखील भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सध्या भारतीय हवामान विभागाकडून मान्सून वर्तवली आहे. दरम्यान आज (दि.०४ जून) पुढच्या चार ते पाच तासांत ठाणे, अहमदनगर, हिंगोली, जालना आणि पुणे जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
सातारा, सोलापूर, रायगड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, बीड, पुणे या जिल्ह्यांत देखील वादळी वाऱ्यासह, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता आहे. तर उद्या (दि.०५ जून) विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
