तर अजित पवार मुख्यमंत्री होतील…..

अजितदादा (Ajit Pawar) मुख्यमंत्री होतील, अशी आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांची सदिच्छा आहे. मात्र त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मेहनत घ्यावी लागेल.

म्हणजेच जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मात्र सध्यातरी अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आहे, असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)
म्हणाले.

महाविकास आघाडी म्हणून जास्त जागा निवडून आल्या पाहिजे. त्यात राष्ट्रवादीच्या जास्त जागा आल्या तर अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात, असा विश्वासही छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

आज छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाशिकमध्ये असताना त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. छगन भुजबळ यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भूमिका व्यक्त केली. सुरुवातीलाच सुरगाणा येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात नरहरी झिरवाळ यांनी भाषणादरम्यान अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य केले. यावर छगन भुजबळ म्हणाले की, अशी झिरवाळ यांची सदिच्छा आहे. मात्र यासाठी महाविकास आघाडी म्हणून जास्त जागा निवडून आल्या पाहिजे. त्यात राष्ट्रवादीच्या जास्त जागा आल्या तर अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात, असा विश्वासही छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment