सुजय विखे पाटील म्हणतात, बाळासाहेब थोरातांना नगर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास…

काँग्रेसने आमदार बाळासाहेब थोरात यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास स्वागतच आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास रंजक स्पर्धा होईल, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर दावा करत माजीमंत्री थोरात यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसमधून पुढे येत आहेत.

याबाबत पत्रकारांनी विचारले असता खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, की ते एक अभ्यासू नेतृत्व आहे. त्यांच्या कार्याचा विचार करून काँग्रेसने त्यांना दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी. भाजपकडून कोण उमेदवार असेल ते माहित नाही. मात्र काँग्रेसकडून थोरात यांना उमेदवारी मिळाल्यास दक्षिण लोकसभा निवडणूकीत स्पर्धा होईल एवढे निश्चित, असे खासदार विखे पाटील म्हणाले.

Leave a Comment